मान्सून बाबत हवामान खात्याने दिली मोठी अपडेट, महाराष्ट्रात या ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस बघा आजचे हवामान today’s weather

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

today’s weather नैऋत्य मौसमी पावसाने आपला पुढचा प्रवास सुरू ठेवला आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर मान्सूनने हळुहळु संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील २४ तासांतही राज्यात पावसाची बॅटिंग सुरू राहील.

अलर्ट जारी

या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

हे पण वाचा:
Chakrivadal paus update पुढील 6 तासात महाराष्ट्राला चक्रीवादळ धडकणार आत्ताच पहा आजचे हवामान Chakrivadal paus update

विदर्भाकडे कूच

मुंबईत दाखल झाल्यानंतर मान्सूनने विदर्भाकडे कूच करण्यास सुरुवात केली. सोमवारपर्यंत मौसमी वाऱ्यांनी निम्मा महाराष्ट्र व्यापला होता. मंगळवारी (ता. ११) मान्सून अकोला, पुसद येथे पोहोचल्याची घोषणा हवामान खात्याने केली. त्यामुळे पुढील ३ दिवसांत विदर्भातील अनेक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

Advertisements

अमरावती, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, आणि अकोला जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळतील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. दुसरीकडे नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धारा, शिवपरभणी जिल्ह्यांत देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हे पण वाचा:
राज्यात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस या भागात अतिवृष्टी Heavy rain

वाऱ्याचा वेग वाढणार

यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी असू शकतो. त्यामुळे वादळाच्या स्थितीत नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, अशी सूचना करण्यात आली आहे. विजा चमकत असताना मोबाईलचा वापर करू नये तसेच झाडाखाली थांबू नये. घरातील विजेची उपकरणे बंद ठेवावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सतर्कतेचे आवाहन

हे पण वाचा:
Heavy rain 24 hours येत्या 24 तासात या 10 जिल्ह्यात मुसळधार पाऊस हवामान खात्याचा मोठा इशारा Heavy rain 24 hours

पावसाळ्यामुळे नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची पिके वाचविण्यासाठी तसेच शहरी भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज असून त्यांना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी आहे. मात्र नागरिकांनीही सतर्क राहून आपली सुरक्षितता प्रथम लक्षात घेतली पाहिजे.

Leave a Comment