मुंबईसह राज्यातील या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पाऊस बघा आजचे संपूर्ण हवामान Heavy rain

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

Heavy rain महाराष्ट्रात मान्सूनचा सामना मुंबईमध्ये पावसाच्या सरी सुरु झाल्यानंतर, आता राज्यभरात पावसाने चांगलाच जोर धरल्याचे दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून या वर्षी राज्यात व्यापायला अजून दोन दिवस लागणार आहेत. तरीही, पुढील चार दिवसांत राज्यभरात पावसाची शक्यता असल्याचे चित्र समोर येत आहे.

जोरदार पावसाची अपेक्षा

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांसह कोकणात पुढील चार दिवस जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हे पण वाचा:
Heavy prediction of rain राज्यात पुढील 11 दिवस पाऊसाची जोरदार बॅटिंग पंजाबराव डख यांचे मोठं भाकीत Heavy prediction of rain

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट

विदर्भातील बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

हे पण वाचा:
Heavy rains today पुढील 4 दिवस राज्यातील 11 जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात आत्ताच पहा आजचे नवीन दर Heavy rains today

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

मराठवाड्यातील बीड, लातूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

पावसाची सुरुवात झाल्याने आनंदही आहे, पण याचबरोबर संभाव्य धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी सावधगिरीही बाळगावी लागेल. दरम्यान, शेतकरी बांधवांनाही मान्सूनच्या या आगमनामुळे दिलासा मिळणार आहे. पावसाचा सरासरी पडाव होऊन पिकांना योग्य ते पाणी मिळाल्यास खरिपाच्या पिकांना चालना मिळेल.

हे पण वाचा:
Ramchandra Sable परतीचा पावसाची तारीख ठरली रामचंद्र साबळेंचा मोठा अंदाज Ramchandra Sable

Leave a Comment