पीक नुकसानीचे पंचनामे होणार नाही; सरसकट शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई crop damage

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

crop damage जिल्ह्यातील 12 हजार 508 शेतकऱ्यांनी ई -केवायसी चे प्रमाणिकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरुन अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही.

त्यासाठी गावस्तरावरील तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामसेवक यांच्यामार्फत ई- केवायसी करण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न करण्यात आले होते. तरी देखील अदयापही शेतकऱ्यांनी e-KYC न केल्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचीत आहे. त्या सर्वांनी ई -केवायसी करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील सन 2022 पासून शेतीपिकाच्या नुकसानीचे अनुदान वितरित करण्यासाठी वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार 2 लाख 13 हजार 416 शेतकऱ्यांना शासनस्तरावरुन डीबीटी प्रणालीद्वारे जवळपास 244 कोटी अनुदान वाटप करण्यात आलेले आहे.

हे पण वाचा:
PM Kisan Yojana पीएम किसान योजनेचे 4000 या दिवशी सप्टेंबरची तारीख ठरली PM Kisan Yojana

मात्र जिल्ह्यातील 12 हजार 508 शेतकऱ्यांनी ई – केवायसी चे प्रमाणिकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरुन अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यासाठी गावस्तरावरील तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामसेवक यांचेमार्फत ई – केवायसी करण्यासाठी यापूर्वी प्रयत्न करण्यात आले आहे. तरी देखील अद्यापही काही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी ई – केवायसी न केल्यामुळे अनुदानापासून वंचीत आहेत.

Nuksan bharpai ekyc विशेषत: माहे जानेवारी 2024 ते माहे मे 2024 या कालावधित जिल्ह्यातील भडगाव, मुक्ताईनगर, पारोळा , अमळनेर व जामनेर या तालुक्यात अवेळी पावसामुळे शेती पिकाच्या नुकसानपोटी 5 हजार 854 शेतकऱ्यांनी ई- केवायसी प्रमाणीकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरून अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करता आले नाही.

तरी संबंधित शेतकऱ्यांनी सी एस सी केंद्र व महा ई सेवा केंद्र येथे जाऊन ई – केवायसी करावे व आपले शेतपिकाच्या नुकसानीचे अनुदान त्वरीत प्राप्त करुन घ्यावे असे आवाहन सर्व संबंधित शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे.

हे पण वाचा:
Jio's new offer launch जिओ ची नवीन ऑफर लॉंन्च 199 रुपयांमध्ये 3 महिन्यांची वैधता अमर्यादित कॉलिंग डेटा Jio’s new offer launch

Leave a Comment