Kharif crop insurance
महाराष्ट्र सरकारने शेतीविषयक नवी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचे नाव ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ असे आहे. ही नवीन योजना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देणारी ठरणार आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे मर्यादित स्वरूप
आतापर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू होती. या योजनेत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या विम्याचे प्रमाण मर्यादित होते. रब्बी हंगामासाठी विमा दर 2%, खरीप हंगामासाठी 1.5% तर नगदी पिकांसाठी 5% इतका होता. शेतकरी यासाठी अगोदरच्या दरांप्रमाणे 700 ते 2000 रुपये प्रति हेक्टरपर्यंत भरणा करत होते.
सर्वसमावेशक पीक विमा योजनेची वैशिष्ट्ये
- शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपया भरून या योजनेत सहभागी होता येईल.
- उर्वरित विम्याची रक्कम राज्य सरकार भरणार आहे.
- ही योजना पुढील तीन वर्षांसाठी लागू राहील.
- कर्जबाजारी आणि बिगर कर्जबाजारी शेतकरी यात सामील होऊ शकतील.
- भाडेकरू शेतकरीही या योजनेत सहभागी होऊ शकतील.
कोणत्या पिकांना विमा संरक्षण
- भात, खरीप ज्वारी, बाजरी, रागी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, काळे, तिळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा
- गहू, रब्बी ज्वारी, हरभरा, उन्हाळी तांदूळ, उन्हाळी भुईमूग आणि रब्बी कांदा
पूरग्रस्तांसाठी शासनाची भरपाई योजना
राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या पुराmuळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून 1.2 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 13,600 रुपये मिळणार आहेत. पूरप्रभावित दहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 3 हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर 13,600 रुपये नुकसानभरपाई मिळेल.
सर्वसमावेशक पीक विमा योजना ही महत्त्वपूर्ण योजना आहे. यामुळे शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल व त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.